Advertisement

महासम्राट बळीराजा रथयात्रेचे कन्हान शहरात भव्य स्वागत


महासम्राट बळीराजा रथयात्रेचे कन्हान शहरात भव्य स्वागत


फुलांचा वर्षाव , शितप्रेय माझा आणि अल्पोहार वितरण करून यात्रेकरूचे स्वागत . 


कन्हान : - महासम्राट बळीराजा राष्ट्र सेवा संघ द्वारे आयोजित दुसऱ्या टप्यात - शिवतीर्थ उमरी (सावनेर) , ते श्री क्षेत्र रामटेक दरम्यान महासम्राट बळीराजा रथ यात्रेचे मराठा सेवा संघ कन्हान आणि आशिष दिवटे परिवार व्दारे " तुमचं आमचं नातं काय ? जय बळीराजा, जय शिवराय " च्या जय घोषात फुलांच्या वर्षाने भव्य स्वागत करण्यात आले .


राष्ट्रीय एकात्मतेसाठी सामुहिक बळीराजा उत्सव साजरा करण्यास महासम्राट बळीराजा राष्ट्र सेवा संघ द्वारे विदर्भ स्तरीय महासम्राट बळीराजा रथयात्रा दुसरा टप्यात शिवतीर्थ उमरी (सावनेर) ते श्री क्षेत्र रामटेक जिल्हा नागपुर , चंद्रपुर , गडचिरोली , गोंदिया , भंडारा भ्रमण करित कन्हान शहरात आगमन होताच मराठा सेवा संघ कन्हान आणि आशिष दिवटे मित्र परिवार तर्फे महामार्गा वरील छत्रपती शिवराय चौकातुन रथयात्रा आंबेडकर चौकात डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळयास माल्यार्पण करून " तुमचं आमचं नातं काय ? जय बळीराजा , जय शिवराय " च्या जय घोषात मार्गक्रमण करून तारसा रोड टी पॉंईट छत्रपती शिवराय चौकात फुलांचा वर्षाव करून भव्य स्वागत करित यात्रेकरूना माझा शितप्रेय आणि अल्पोहार वितरण करण्यात आले . 

याप्रसंगी मार्गदर्शनात महासम्राट बळीराजा फक्त कृषी/शेतकरी नव्हे तर व्यापार , तंत्रज्ञान , विज्ञान , कला , युद्धनीती , संस्कृती समृद्ध करणारा सर्वांचा , समस्त भारतीयांचा कुळ स्वामी , महानायक , रक्षक , समतावादी , प्रजाहितदक्ष , स्वामी तिन्ही जगाचा , महादानशुर , महाबली , अलिखित संविधान देणारा पहिला महासम्राट बळीराजाच्या विशाल साम्राज्याची राजधानी - महाबलीपुर (तामिळनाडु) असुन सरसेनापती खंडोबा , ज्योतीबा , म्हसोबा , काळभैरव , मल्हारी , बिरोबा , मार्तंड , भैरोबा , भराडी हे होते . 

" माझी प्रजा उपाशी राहु नये , अन्नदाता सुखी भवः,इडा पिडा टळो' म्हणुन सतत काळजी घेणारा . इतका जीवलग की सात काळजाच्या आत कायम जपुन ठेवावा . म्हणुनच 'इडा पिडा टळो, बळीराज्य येवो, सुमारे ३००० वर्षापासुन समस्त भारतीय त्याच्या पुनरागमनाची प्रतिक्षा करित आहेत . यास्तव राष्ट्रीय एकात्मतेसाठी सामुहिक बळीराजा उत्सव दिवाळीच्या बलीप्रतिपदेच्या दिवसी घरोघरी व सामुहिक साजरा करण्याचे आवाहन रथयात्रेचे आयोजन प्राध्यापक मा.अभिविलास नखाते सर हयांनी केले . 


यावेळी गुरूदेव सेवा मंडळाचे ज्ञानेश्वर रक्षक , वनिता वनकर , सुनंदाताई दिवटे यांनी महासम्राट बळीराजा रथयात्रा काढुन आम्हच्या बळीराज्याच्या विषयी जनजागृती केल्या बद्दल त्यांचे अभिनंदन करून " बळीराजाचे करून पूजन , लावा दीप अंगणी। सुख-समृद्धी येईल घरी , ईडा पिडा टळोनी॥ " असे संबोधित केले . तदंनतर रथयात्रा पुढे मार्गक्रमण करण्यात आले . महासम्राट बळीराजा रथयात्रा स्वागत सोहळयाच्या यशस्वितेकरिता मराठा सेवा संघाचे शांताराम जळते , मोतीराम रहाटे , वसंतराव इंगोले , संदीप कुकडे , माजी नगरसेवक राजेश शेंदरे , राकेश घोडमारे , संजय चंहादे , दिपक उघडे , नेवालाल पात्रे , राजेश गुडधे , ओमप्रकाश काकडे , हरिष भेलावे , गजानन वडे , माजी नगरसेवक मनोज कुरडकर , दिनेश नानवटकर , अजय लोंढे , चंद्रगुप्त पानतावणे , अमोल साकोरे , सुरेश कळंबे , सचिन वासनिक , जिजाऊ ब्रिगेड कन्हान मायाताई इंगोले , लताताई इंगोले , छायाताई नाईक , सुनंदाताई दिवटे , सपना इंगोले , निकिता जळते , माजी नगरसेविका संगिता खोब्रागडे , सुषमा चोपकर , अनिता पाटील , मिनाताई कळंबेसह आदि नागरिकांनी उपस्थित राहुन सहकार्य केले .


कन्हान प्रतिनिधि - ऋषभ बावनकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या